महाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय अंगणवाडी सेविका २०१७-१८च्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अर्चना सालोदे, वनिता कोसे, अंजली बोरेकर, अक्काताई ढेरे व स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांच्या समावेश आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ७ जानेवारी रोजी प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

 

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अधितात्याखाली येणाऱ्या 'एकात्मिक बाल विकास सेवा' योजनांची उत्तम अंमलबजावणी करणा-या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

निवड झालेल्या अंगणवाडी सेविका व त्यांचे कार्यक्षेत्र

 

अमरावती जिल्ह्यात वरूड बाल विकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत कुरली अंगणवाडीच्या अर्चना सालोदे, टेंभुलखेडा अंगणवाडीच्या वनिता कोसे, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्हयातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@