महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचा मेळा २८जानेवारीपासून भरणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ या काळात हा स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी हा यामागील उद्देश असणार आहे. यामुळे थेट शासनासोबत काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

 

या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून २०१८ मध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्यावर्षी तब्बल ९०० स्टार्टअप या उपक्रमात सहभागी झाले होते. शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहीत ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील स्टार्टअप नी आपले अर्ज महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

अर्ज केलेल्यांपैकी उत्कृष्ट ठरलेल्या १०० स्टार्टअप्सना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योग जगतातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्या समोर मांडण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप नी सादर केलेल्या सादरीकरणाच्या आधारे समितीमार्फत चर्चा होऊन त्यातील निवडल्या गेलेल्या २४ विजेत्या स्टार्ट-अप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतची शासकीय कामे देण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी २०१९ असून इच्छुक स्टार्टअप www.mahastartupweek.msins.in याठिकाणी अर्ज करू शकतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@