मराठा आरक्षणाविरुद्ध इम्तियाज जलील यांनी दाखल केली याचिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
मुंबई : मराठा आरक्षण रद्द करा. अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यासाठी जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करावा. अशी मागणीदेखील जलील यांनी केली आहे.
 

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या १६ टक्के आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या. असे जलील यांनी या याचिकेत म्हटले आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयगोच्या याबद्दलच्या अहवालाला त्यांनी आव्हान दिले आहे. राज्यात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. असे असताना मराठा समाजाला आरक्षण देऊन, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा डावलला जात आहे. असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम समाजाचे आणि त्यातील काही घटकांचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात यावे.

 

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम वर्गाला तात्काळ आरक्षण द्यावे. अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अॅड. सतीश तळेकर यांनी ही याचिका शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. मुख्य याचिकेसोबत या याचिकेबाबतही २३ जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम पक्षाचे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@