रविवारी प.रे.वर जम्बोब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



मुंबई : रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल आदी कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक तर मध्य हार्बरवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड माटुंगा अप धीम्या मार्गावर सकाळी ११.१० ते ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या ब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

 

ठाणे येथून सकाळी १०.३७ ते ३.३१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान जलद मार्गावरून धावतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकात थांबा घेतील. माटुंगापुढे पुन्हा अप धीम्या मार्गावरून धावतील. कल्याण येथून रविवारी सकाळी ११.०४ ते ३.०६ वाजेपर्यंत जलद व अर्धजलद गाड्या दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात अतिरिक्त थांबे घेतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा गाड्या १५ मिनिटे उशिराने धावतील. सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या जलद व अर्धजलद गाड्या रविवारी सकाळी १०.१६ ते २.५४ वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबे घेतील. तसेच नियोजित स्थानकात २० मिनिटे उशिराने पोहचतील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व धीम्या गाड्या रविवारी सकाळी ११ ते ५ यावेळेत १० मिनिटे उशिराने पोहचतील.

 

सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते ४.१० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. वाशी, बेलापूर, पनवेल येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या गाडया सकाळी ११.३४ ते ४.२३ वाजेपर्यंत आणि वडाळा येथून अंधेरी, वांद्रे, गोरेगाव येथे जाणाऱ्या गाड्या सकाळी ९.५६ ते ४.१६ वाजेपर्यंत रद्द राहतील. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यान सकाळी ९.५३ ते २.४४ वाजेपर्यंत आणि गोरेगाव, अंधेरी, वांद्रे येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या गाड्या सकाळी १०.४५ ते ४.५८ वाजेपर्यंत रद्द राहतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@