नेमके कुठे चाललो आहोत आपण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019   
Total Views |


 

काय चाललं काय आहे या समाजात? कुठे चाललो आहोत नेमके आपण? तिकडे जग मंगळावर वस्ती निर्माण करण्याची तयारी करतेय्अन्आपण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका मुस्लिम माणसाची दाढी, ऑपरेशनसाठी असली तरी कापावी का न कापावी यावर चर्चा करतोय्‌? सारा समाज जिवाचा कान करून ऐकतोय्ती चर्चा! आजघडीला सार्या जगात सर्वाधिक महत्त्वाचा कुठला असला, तर हाच प्रश्न शिल्लक राहिला असल्यागत, शबरीमलै मंदिरात चाळीशीच्या आतील महिलांना प्रवेश मिळण्याचा मुद्दा हाताळला जातोय्सध्या.
 
या मागणीसाठी न्यायालयात प्रकरण दाखल करण्याइतकी फुरसत मागणीकर्त्यांना अन्वर्षानुवर्षे प्रलंबित इतर लाखो प्रकरणांकडे दुर्लक्ष करून शबरीमलै प्रकरणातील सुनावणी प्राधान्याने घेण्याची बुद्धी आणि फुरसत न्यायालयाला होणे, हा केवळ योगायोग मानायचा? एरवी, स्त्री-पुरुषांमधील भेदावर तीव्र आक्षेप असल्याने या मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश मिळावा यासाठी आग्रह धरणार्या स्वयंघोषित पुरोगामी महिलांना, तिथल्या प्रवेशापूर्वीच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर जराही आक्षेप असू नये? का स्वीकारला त्यांनी तो पर्याय? की काहीही करून मंदिरात प्रवेश मिळविण्याची आणि नंतर विजयाच्या उन्मादात शेखी मिरवत राजकारण करण्याची घाई झाली होती त्यांना? भाविकांच्या या शुद्धीकरण सोपस्कारासाठी मंदिर इतर भाविकांसाठी तासभर बंद ठेवल्याबद्दल केरळच्या मुख्यमंत्र्यांनाही संताप आवरेनासा झाला. हातातली इतर सारी महत्त्वाची कामे बाजूला ठेवून, याविषयीचा रोष त्यांना जाहीरपणे व्यक्त करावासा वाटला... तेवढी उंसत त्यांना झाली... सारेच अजब, अतर्क्य अन्अनाकलनीय आहे...
 

भारताबाहेरील देशांतील लोकांची जीवनशैली हा आमच्यासाठी नेहमीच औत्सुक्याचा विषय राहिला आहे. तो थाट, तो झगमगाट. जगण्याची ती अनिर्बंध, शाही तर्हा तर आकर्षणाचाही विषय असतो भारतीय जनतेसाठी. पण, तसलं जीवन वाट्याला यावं म्हणून चाललेली त्यांची धडपड, कामाप्रतीचं त्यांचं समर्पण, ती मेहनत, ती सचोटी याची दखल नाही घेत इथे कुणी. आपल्याकडे तर कामावर हजर होताच चहासाठी म्हणून बाहेर पडण्याची घाई झालेली असते लोकांना. सरकारी कार्यालयात तर साराच आनंदिआनंद असतो. काम आणि मेहनत सोडून बाकी सारेकाही करायची तयारी असते लोकांची. शिळोप्याच्या गप्पा हाणण्यात तर भारीच स्वारस्य लोकांना! त्यात वेळ वाया घालवण्यातही कोण आनंद मिळतो लोकांना. त्या सलमान खानचं लग्न कशामुळे रखडलं असेल, इथपासून तर अनुष्का अन्विराट लग्नानंतर हनिमूनला कुठे जाणार आहेत, इथवरच्या चर्चेत भारी रस असतो लोकांना. स्वत:च्या घरातल्या महत्त्वाच्या समस्यांपेक्षाही, जातीने लक्ष घालण्याजोगा मुद्दा असतो त्यांच्यासाठी हा! अन्त्या चर्चेवर खर्ची घालायला वेळही भरपूर उपलब्ध असतो सर्वांकडेच. बरोबर आहे. ज्या देशात एखाद्या चित्रपट कलावंताचं लफडं ही ब्रेकिंग न्यूज असते, बोरिंगमध्ये अडकलेल्या प्रिन्सला बाहेर काढण्याच्या प्रक्रियेचे लाईव्ह टेलिकास्ट जिथे होऊ शकते, दिवसभर त्या घटनेचे दळण दळण्यासाठी जिथे लोकांकडे सवडही असते, जिथे तद्दन फालतू मुद्यांवर तासन्तास चर्चा घडू शकते, एखाद्याच्या वैयक्तिक भांडणाचा बिनपैशाचा तमाशा बघायला शंभरावर लोकांची गर्दी सहज जमू शकते, तिथे लोकांच्या वर्तणुकीच्या फुरसती तर्हेवर आक्षेप नोंदविण्याला अर्थ तरी कुठे उरतो?

 

मग काय, दवाखान्यात मुस्लिम व्यक्तीची दाढी कापण्यावरूनही तक्रार दाखल होऊ शकते. कुणीतरी दीडशहाणा त्या तक्रारीची गांभीर्यानं दखलही घेऊन जातो. पेशंट मुस्लिम असेल तर मग, खूपच आवश्यक असल्याशिवाय त्याची दाढी कापण्यात येऊ नये, असे टुकार दर्जाचे आदेश जारी होतात. त्याचीदेखील ब्रेकिंग न्यूज होऊ शकते. दाढी राखणे हा मुस्लिमांचा धार्मिक अधिकार असल्याने वैद्यकीय कारणांवरून हनुवटी गुळगुळीत झाली तर तो धर्माचा अवमान ठरू शकतो, असा जावईशोध लावून काही शहाणे लोक मोकळेदेखील झालेले असतात या प्रकरणात. त्या सैफ अलीपासून तर शाहरुखपर्यंत एकही खान दाढी राखत नाही, तेव्हा कोणत्याच धर्माचा अवमान होत नाही. फक्त दवाखान्यात दाखल एका पेशंटच्यासंदर्भात मात्र धार्मिक भावनांना ठेच पोहोचते लागलीच? केरळात पुराचे संकट उभे ठाकले असताना, सार्या देशातून मदतीचा ओघ तिकडे प्रवाहित झालेला असताना, लोकांची धावाधाव केरळच्या दिशेने सुरू झालेली असताना, आपल्या विदेश दौर्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम चुकणार नाही याची काळजी घेणार्या तिथल्या मुख्यमंत्र्यांना परवा, शबरीमलै मंदिरातील महिलाप्रवेशाच्या प्रकरणात मात्र जातीने लक्ष घालावेसे वाटले? केरळातले इतर सारे प्रश्न संपलेत, की पिनाराई विजयन्यांच्या लेखी राज्यात आता दुसरा कुठलाच प्रश्न शिल्लक राहिलेला नाही, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून लक्ष घालण्याजोगा?

 

या देशात अतिशय टुकार अशा विषयांवरच्या हिंदी सीरियल्स वर्षानुवर्षे का चालतात, आतून कधीही न बघितलेल्या अंबानींच्या भल्यामोठ्या घरावरील चर्चेत लोक आपला किमती वेळ का घालवतात, दिग्विजयिंसह फालतूची बडबड करून लोकांचे लक्ष का वेधून घेऊ शकतात, कुठलीही शहानिशा न करता आसाराम बापूच्या दरबारात मोठ्या प्रमाणात भाविक हजर का होतात, ठाऊक आहे? कारण तेवढी फुरसत असते या सर्वांना. अडचण फक्त एवढीच की, कीर्तनाचा कार्यक्रम असला की समोर जागा चिक्कार असते, पण मोजायला डोकी नसतात अन्तमाशाचा फड मांडला की उपलब्ध जागेत मावणार नाहीत अशी गर्दी जमते रसिकांची. एखाद्या चांगल्या विषयावर कुणाचे भाषण आयोजित करावे, तर श्रोते शोधून शोधूनही सापडत नाहीत अन्रस्त्याच्या कडेला चाललेले तिर्हाईतांचे आपसातले भांडण बघायला न बोलावताही गर्दी जमते लोकांची... खरंच, अजब आहे ना सारे?

 

एकीकडे वेळेच्या सदुपयोगाची महती सांगणार्या, वेळेचा अपव्यय टाळण्यास सुचविणार्या सुविचारांचा प्रसारही हेच लोक करतात, इतरांच्या कुचेष्टेत वेळ न दवडण्याचा सल्लाही यांचाच असतो, दुर्दैवाने पानठेल्यांवर चकाट्या पिटत दिवसातला मौल्यवान वेळ वाया घालवणार्यांच्या गर्दीतही समावेश यांचाच असतो. तिकडे सातासमुद्रापल्याडच्या लोकांनी अवकाशाच्या दिशेने घेतलेली झेप, हा आमच्यासाठी चुन्यासोबत चोळलेल्या तंबाखूच्या सोबतीने चघळण्याचा विषय असतो. यात गंमत शोधायची की दुर्दैव, एवढाच शिलकीचा प्रश्न आहे. पण हे मात्र खरंच की, विचारांच्या संदर्भातल्या श्रीमंतीचा जो आब सामान्यत: लोक त्यांच्या बोलण्यातून दाखवतात, वर्तणुकीच्या संदर्भात नेमकी त्याचीच वानवा जाणवते. इथे वाया घालवायला भरपपूर वेळ असतो प्रत्येकाकडे. फक्त तातडीची निकड असलीकीच सवड होत नाही कुणाला. मग तद्दन फालतू कारणांची भलीमोठी यादी समोर करून, आपल्या असमर्थतेचेही कडवे समर्थन करण्याची अलीकडे प्रचलित झालेली रीत हा त्याचाच परिपाक आहे.

 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारांनी मांडलेले, उचलून धरलेले मुद्दे खूप महत्त्वाचे असतात. त्यावरून त्या उमेदवाराच्या विचारांची, भविष्यातील त्याच्या कार्यपद्धतीची दिशा स्पष्ट होते. ते मुद्दे, ती दिशा, ती पद्धती आवश्यक आहे की नाही, ती देशहिताची आहे की नाही, याबाबत सारासार विचार करून लोक मतदानाचा, उमेदवार निवडीचा निर्णय घेतात. घरबसल्या टीव्हीवर ऐकलेली भाषणं पुरेशी असतात यासंदर्भात लोकनिर्णयार्थ. आपल्याकडे तर निवडणूक म्हटली की नुसता उत्सव असतो. जाहीर सभा काय, रॅलीज काय, बॅनर-पोस्टर्स-बिल्ले काय... अन्तरीही कितीतरी लोक आदल्या रात्री दारू कुणी वाटली, यावरून मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेत असतील, तर लोकशाहीव्यवस्थेतील मूल्यांच्या र्हासासाठी जबाबदार कुणाला ठरवायचे? मतदानाच्या दिवशी मिळणार्या सुट्टीचासदुपयोगकरून पिकनिक प्लान करून मतदान टाळणार्या महानुभावांचा महिमा तर आणखीच निराळा!

जीवनशैलीपासून तर मेहनतीपर्यंत, समर्पण भावनेपासून तर स्वत:च्या अधिकारांबाबतच्या जागरूकतेपर्यंत, सार्वजनिक ठिकाणी ते करीत असलेल्या नियमांच्या पालनापासून तर मतदानासंदर्भातील त्यांच्या निर्णयशैलीपर्यंत एकही बाब स्वीकारण्याची तयारी नाही कुणाचीच इथे. तरीही आम्हाला आमची तुलना मात्र त्यांच्याशीच करायची आहे... आहे ना गंमत?

@@AUTHORINFO_V1@@