पिंपरीत मेट्रोची मोठी ड्रिल मशीन कोसळली रस्त्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |


 


पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी भली मोठी ड्रिल मशीन रस्त्यावर कोसळली. पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बांधकामासाठी रस्ता बंद केला असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमका हा प्रकार कसा घडला याचे कारण अद्याप समजून शकलेले नाही.

 

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असा आहे. त्यापैकी पिंपरी ते दापोडी हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोचे पिल्लर, वाय डक्ट, रनवेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. प्रमुख चौकांमध्ये मेट्रोचे पिलर उभे करण्यासाठी जमिनीखाली खडक किती अंतरावर आहे, त्याचा पोत कसा आहे हे पाहण्यासाठी या अवाढव्य ड्रिल मशीनच्या माध्यमातून खड्डे करण्यात येतात. त्यानंतर तेथे पिलर उभे केले जाताते. अशाच पद्धतीने नाशिक फाटा येथे काम सुरू असताना ही अवाढव्य क्रेन शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली.

 

अपघातात कुठलीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. "ही एक दुर्देवी घटना असून याची चौकशी करण्यात येईल. तसेच, सुरक्षा नियमांचे पालन करण्यासंदर्भात कंत्राटदारांना कठोर इशारा देण्यात येईल." असे महाराष्ट्र मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@