‘झिंग झिंग झिंगाट’ कार्यक्रमाच्या सेटला आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 
मुंबई : चेंबूर येथील एसएल स्टुडिओला आग लागली. शनिवारी दुपारी ३:३० वाजता शॉकसर्किटमुळे ही आग लागली. झी मराठी वाहिनीवरील ‘झिंग झिंग झिंगाट’ या सुप्रसिद्ध अंताक्षरीच्या कार्यक्रमाचे चित्रिकरण या स्टुडिओमध्ये होते. आग लागली तेव्हा ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर हे कार्यक्रमाच्या सेटवर उपस्थित होते.
 

सुदैवाने आदेश बांदेकर या आगीतून सुखरुप बचावले आहेत. अंताक्षरीच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना या आगीतून वेळीच सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही आग लागली तेव्हा कार्यक्रमाच्या सेटवर सुमारे १५०-२०० लोक उपस्थित होते. सेटवर आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध असल्याने आगीचा मोठा भडका उडण्याआधीच ती आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@