‘त्या’ बसअपघातप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 
 
पोलादपूर : आंबेनळी घाटात झालेल्या बसअपघातप्रकरणी सहा महिन्यानी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या बसला हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये कृषी विद्यापीठाच्या ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बसच्या मृत वाहनचालक प्रशांत भांबेड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसचालक प्रशांत भांबेड याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या अपघातादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पोलादपूर येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते.
 

दापोली येथे असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत या कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पावसाळ्यानिमित्त महाबळेश्वर येथे सहलीला जात होते. या सहलीसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. दरम्यान आंबेनळी घाटात या बसला भीषण अपघात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातामध्ये बसचा पार चेंदामेंदा झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रकाश सावंत देसाई हे या अपघातातून चमत्कारिकरित्या बचावले. खोल दरीतून वर आल्यावर त्यांनी मोबाईलवरून फोन करून विद्यापीठातील अधिकाऱ्यांना या बस अपघाताविषयी माहिती दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@