बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप ; मेस्मा लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |



मुंबई : बेस्टचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेस्ट कर्मचाऱ्यांना 'अत्यावश्यक सेवा कायदा' (मेस्मा) लागू केला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनला प्रशासनाकडून ७ आणि ८ जानेवारीला चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. हा कायदा लागू झाल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

 

बेस्ट प्रशासनासोबत चर्चा निष्फळ

 

नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी करण्याबाबत शुक्रवारी बेस्ट कृती कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात चर्चा झाली. परंतु, या चर्चेचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांनी संपाची हाक दिली आहे. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी संप पुकारला आहे. यावेळी, बेस्टचे ३० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेस्टचा बंद सुरु होईल, अशी माहिती बेस्ट कामगारांच्यावतीने देण्यात आली होती.

 

काय होती मागणी?

 

नव्या वेतनकराराच्या वाटाघाटी सुरू करण्यात याव्यात. अनुकंपा तत्वावरील भरती सुरू करावी. महापालिका कर्मचाऱ्यांइतका बोनस मिळावा. तसेच बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात सामावून घेण्याबाबत प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात यावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@