सेवाग्राम विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019
Total Views |


 


अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती


मुंबई : वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकासासाठी १८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी वर्धा यांना करून दिल्याची माहिती अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने ४ जानेवारी २०१९ रोजी निर्गमित केला असल्याचे देखील ते म्हणाले. सेवाग्राम परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १६२.५१ कोटी रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा राबविला जात आहे. या आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी २०१८-१९ या वित्तीय वर्षात २६ कोटी ८ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

 

यासोबतच श्रीक्षेत्र घृष्णेश्वर, वेरुळ विकास आराखड्यासही शासनाने मान्यता दिली आहे. हा आराखडा ११२.४१ कोटी रुपयांचा असल्याची माहिती देखील मुनगंटीवार यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आराखड्यातील सन २०१८-१९ या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या १३ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीपैकी ९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@