''विदर्भात व्यवसायाभिमुख मनुष्यबळाची गरज''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019
Total Views |
 

नागपूर : विदर्भात खनीज व वनसंपत्तीवर आधारित उद्योगांची स्थापना झाल्यास त्यांना लागणारे कुशल मनुष्यबल निर्माण होणे गरजेचे आहे. अशा मनुष्यबळासाठी व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण देणाऱ्‍या संस्था विदर्भात आता उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपरात केले.

 

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दिनांक ४ ते ६ जानेवारी दरम्यान फॉर्च्यून फाऊडेशन, नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इंजिनियरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशनद्वारे आयोजित युथ एम्पॉवरमेंट समिटच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

 

गडचिरोली, चंद्रपूर सारख्या वनक्षेत्रातील वनउपजावर आधारित औद्योगिक धोरण महाराष्ट्र सरकारने आखावे. यामुळे गडचिरोली मेळघाट मध्येच उद्योग स्थापन होतील व स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली. नागपूरात एम्‍स, आयआयएम, आयआयटी, तसेच इतर प्रमुख शैक्षणिक संस्‍था स्‍थापन झाल्‍या असून त्‍यांच्‍या मार्फत व्‍यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण येथील युवकांना मिळणार आहे.

 

उद्योगासाठी पाणी, वीज तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्‍ध झाल्‍याने मिहानसारख्‍या प्रकल्‍पात मोठे मोठे उद्योग गुंतवणूक करत आहेत. मेट्रो प्रकल्‍प, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रांत रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध असून विदर्भातील ५० हजार युवकांना रोजगार प्राप्‍त करून देण्‍याचे आपले लक्ष्‍य आहे, असे याप्रसंगी गडकरी यांनी नमूद केले.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@