शेअर बाजार सावरला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019
Total Views |
 


मुंबई : बॅंकींग क्षेत्रातील विक्रीनंतरही आठवडाअखेरीस भारतीय शेअर बाजार सावरत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभराच्या कामगिरीनंतर १८१ अंशांनी उसळी घेत ३५ हजार ६९५.१० स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५५ अंशांनी उसळी घेत १० हजार ७२७.३५ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये आयडीएसएस बॅंक आणि सिंडिकेट बॅंकेच्या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्स ७१ अंशांच्या तेजीसह १५ हजार १४७ स्तरावर तर स्मॉल कॅप इंडेक्स १९ अंशांनी वधारत १४ हजार ५९२ अंशांच्या स्तरावर बंद झाला.

 

गुरुवारी १० हजार ७००च्या खालेले निफ्टी शुक्रवारी ५५ अंशांनी वधारत १० हजार ७२७ अंशांच्या टप्प्यावर पोहोचला. आयटी कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टीमध्ये एकूण ३३ शेअर वधारत बंद झाले, तर उर्वरित १७ शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली होती. सार्वजनिक बॅंकांच्या शेअरमध्ये २.३२ टक्क्यांची तेजी दिसून आली. स्मॉल कॅपमध्ये ०.३७ टक्के तेजी नोंदवण्यात आली. निफ्टीतील मिडकॅप ०.८७ अंशांच्या तेजीसह ४ हजार ८४७ अंशांवर बंद झाला.

 

सेन्सेक्समध्ये आयनॉक्स लेझर लिमिटेड, आयडीएफसी बॅंक, सिंडिकेट बॅंक, भारती इन्फ्राटेल, पीएनबी आदी शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली. तर टीसीएस, इन्फोसिस, इंडसइंड बॅंक, हिरो मोटो कोर्प, सन फार्मा आदी शेअर घसरले. निफ्टीमध्ये भारती इन्फ्राटेल, टाटा मोटार्स, बीपीसीएल, ओएनजीसी, भारती एअरटेल हे शेअर वधारले. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, हिरो मोटोकोर्प आदी शेअरमध्ये घसरण झाली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@