दिव्यांग गिर्यारोहक अरूनिमाने रचला विश्वविक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019
Total Views |


नवी दिल्ली : जागतिक स्तरावर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम दिव्यांग गिर्यारोहक आणि माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अरूनिमा सिन्हा हिने विश्वविक्रमाद्वारे केला आहे. अंटार्टिकातील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन सर करत जगातील पहिली दिव्यांग गिर्यारोहक ठरली. अरूनिमाने यापूर्वी जगातील सर्वात मोठे शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले आहे. आता ती माऊंट विन्सन सर करणारी पहिली दिव्यांग महिला ठरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

 
 

अरुनिमाच्या या विश्वविक्रमी कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन कौतुक केले. त्यांनी अरूनिमाने एक वेगळीच उंची गाठली असून तिचे अभिनंदन केले. अरुनिमा भारताचा अभिमान आहे. तिने तिच्या आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावार स्वतःला सिध्द करुन दाखवले आहे.असे ट्विट करत अरुनिमाचे अभिनंदन केले आहे.

 

राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळणाऱ्या अरुनिमा सिन्हाला २०११ मध्ये काही दरोडेखोरांनी चालत्या रेल्वेतून बाहेर फेकले होते. यावळी तिचा एक पाय तुटला पण, तिने हार न मानता सहा खंडातील सर्वात मोठी शिखरे सर करण्याचा निर्धार केला. त्यातील एव्हरेस्ट, किलिमांजारो, कोसियुझ्को अकोकागुआ शिखरे सर केली आहेत. आता या विक्रमात तिने माऊंट विन्सन सर केले आहे.

 
 
 

अरुनिमाला पहिल्यापासूनच गिर्यारोहक बनायचे होते. ज्यावेळी अपघाता ती रुग्णालयात होती. तेव्हा गिर्यारोहणाविषयीची पुस्तके वाचून तिने गिर्यारोहक होण्याचा निर्धार केला.गिर्यारोक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरच्यांनी पूर्ण पाठींबा दिला, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@