राज ठाकरे…एक बोलघेवडा पोपट !!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : नव्या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी एएनआयया वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कॉंग्रेस आणि विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर राज ठाकरेंना जिव्हारी लागले आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून टीका केल्यानंतर भाजपने राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी आता चला हवा येऊ द्याया कार्यक्रम पाहत आपला वेळ घालवावा, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्राला उत्तर देणारे व्यंगचित्र पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

भाजपने काढलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरेंच्या रुपात एक पोपट दाखवण्यात आला आहे. त्याला बोलघेवडा पोपट, असे नाव दिले आहे. यात खुर्चीवर शरद पवार व राज ठाकरे बसले असून साहेब बोला काय विचारू?’, असे राज ठाकरे यांनी विचारताच, पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदीविरोधी प्रश्नच विचारा उत्तर तयार आहे, असे पवार म्हणताना दिसत आहेत. बारामतीच्या पोपटाने घेतलेल्या मुलाखतीत बारामतीच्या साहेबांनी मोदींवर पुन्हा टीका, असा मथळाही व्यंगचित्रात आहे. क्रोध मोदींच्या यशाचा, असे शीर्षक व्यंगचित्राला दिले आहे. राज ठाकरेंच्या आसनामागे राजाला साथ द्या’, या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत आणि मनसेचे इंजिन पुलावरून कोसळतना दाखवले आहे. एक सेटिंगवाली मुलाखत असेही शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आले आहे.

 
 
 

एकंदरीतच काय जे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले, त्याच व्यंगचित्राची नक्कल करून राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे आणि त्यांना बोलघेवडा पोपट म्हटले आहे. गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्याच मुलाखतीचा संदर्भ वापरून हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे. पुन्हा नरेंद्र देवेंद्र मिशन हे भाजपचे अधिकृत फेसबुक पेज नसून भाजप समर्थकांतर्फे चालवण्यात येणारे पेज आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@