'पबजी'वर बंदी घाला ; चिमुरड्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : 'पबजी' या ऑनलाईन गेमवर बंदी घालावी अशी मागणी ११ वर्षीय विद्यार्थ्याने राज्य सरकारला केली आहे. या आशयाचे पत्र राज्य सरकार, केंद्रीय विधी व न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिले आहे. या गेममुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा या मुलाने पत्रात केला आहे. अहाद निझाम असे या मुलाचे नाव आहे. तो मुंबईमधल्या वांद्र्यातील आर्य विद्यामंदिर या शाळेत शिकतो. यासंदर्भात न्यायालयात पीआयएल दाखल करणार असल्याचेही त्याने पत्रात लिहिले आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून पबजी या ऑनलाइन गेमने मुलांना वेड लावले आहे. या गेममुळे मुले हिंसक होत असून त्यांच्या मनात वाईट विचार रुजत आहेत. यामुळे या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी ११ वर्षांच्या अहद नियाझने केली आहे. या खेळामुळे अनेक जण रात्रभर झोपतही नाहीत. पबजीचे व्यसन हा एका प्रकारचा मानसिक आजार असल्याचं मनोवैज्ञानिक डॉ. हरीश शेट्टी यांचे मत आहे. दरमहा पबजीमुळे १०-१५ तरुण मानसिक रुग्ण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@