अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. निवडणुकीआधी मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प मांडण्याच्या ते तयारीत आहेत. दरम्यान, संपूर्ण अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर, सरकारनेही विरोधकांना उत्तर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल.

 

वर्तमान लोकसभेच्या अंतिम सत्रामध्ये राफेल प्रकणावरुन विरोधक सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारनेही यावर उत्तर देण्याची जय्यत तयारी केली आहे. तसेच नोटाबंदीने कथित बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे, असा अहवाल सांख्यिकीय आयोग प्रसिद्ध करणार होते. मात्र, सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. या प्रकरणावरही विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

 

मोदी सरकारचा हा सहावा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती बरी नसल्याने पियुष गोयल अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंतच्या मुदतीपर्यंतचा ताळेबंद मांडला जाईल. त्यात संबंधित काळतील खर्च आणि महसुलाचाही तपशील देण्यात येईल. हंगामी अर्थ मंत्री पीयूष गोयल १ फ्रेबूवारीला लेखानुदान संसदेत मांडणार आहेत. अवघ्या तेरा दिवसाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष कामकाजाचे केवळ आठच दिवस असणार आहेत. या कालावधीमध्ये प्रत्यक्ष कराच्या रचनेत बदल करणे अशक्य आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@