देवच तुम्हाला वाचवू शकेल, कार्ती चिदंबरमला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कार्ती चिदंबरम यांना खडेबोल सुनावले. कार्ती चिदंबरम यांना गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी ईडीसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. चौकशीदरम्यान सहकार्य केले नाही, तर मग देवच तुम्हाला वाचवू शकेल. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
 

आयएनएक्स या मीडिया टेलिव्हिजन कंपनीला ३०० कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीसाठी सरकारी परवानग्या मिळवून दिल्याचा आरोप कार्ती चिदंबरम याच्यावर आहे. कार्ती चिदंबरम यांनी या परवानग्या मिळवून देण्यासाठी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरु आहे. याप्रकरणी सुनावणीदरम्यान सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिले होते. कार्ती चिदंबरम यांची चौकशी कधी करायची आहे, त्याची तारिख ३० जानेवारीपर्यंत स्पष्ट करावी. असे सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीला सांगण्यात आले होते.

 

बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान, ५,६,७ आणि १२ मार्च रोजी कार्ती चिदंबरम यांची चौकशी करण्यात येईल. असे ईडीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ५,६,७ आणि १२ मार्च या तारखांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना दिले. तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करत नाही. आम्ही यावर आता अधिक भाष्य करणार नाही. पण जर तुम्ही चौकशीदरम्यान, सहकार्य केले नाही. तर मग फक्त देवच तुम्हाला वाचवू शकेल. तुमच्याविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल. असे सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना बजावले. देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली.

 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यास परवानगी दिली आहे. युनाईटेड किंगडम आणि फ्रान्स येथे चिदंबरम यांच्या कंपनीतर्फे टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कार्ती चिदंबरम यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही परवानगी दिली, परंतु परदेशातून परतण्याची हमी म्हणून सर्वोच्च न्यायालयात १० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@