आता कल्याण ते नाशिक, पुणे प्रवास अवघ्या २ तासात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : रेल्वे प्रशासनाने नाशिक-पुणेकरांना एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेवर चालविण्यात येणाऱ्या लोकलपेक्षा या लोकलची विशेष बांधणी करण्यात आली आहे. या लोकलची फेब्रुवारी महिन्यात चाचणी करण्यात येणार आहे. सध्या सीएसएमटी स्थानक ते नाशिक अशी लोकल सेवा सलग नसून, त्याऐवजी सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते नाशिक व पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. अत्यावश्यक ब्रेक सीस्टिमसह, उच्चदाब शक्ती, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा या लोकलमध्ये असेल.

 

१२ डब्यांची लोकल फेब्रुवारी महिन्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुणे - नाशिक येथील प्रवाशांना लवकरच या लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे. मध्य रेल्वेसाठी अशा प्रकारातील सहा ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून बनविण्यात आल्या आहेत. यासह या लोकलची चाचणी याच फॅक्टरीत करण्यात आली आहे. पुढील चाचणीसाठी ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये जानेवारी महिनाअखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस दाखल होईल. कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अंतर कापण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार आहे. नाशिक आणि पुणे दरम्यान सर्व स्थानकांवर लोकल थांबेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@