सेन्सेक्स ३७७ अंशांनी गडगडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |
 

मुंबई : मेटल, ऑटो, बॅंकींग शेअरमध्ये गुरुवारी झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकं सेन्सेक्स ३७७ अंशांनी घसरून ३५ हजार ५१३ च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२० अंशांच्या घसरणीसह १० हजार ६७२ अंशांवर बंद झाला. केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळाने विजया, देना आणि बॅंक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाला मंजूरी दिल्यानंतर देना आणि विजया बॅंकेच्या शेअरमध्ये घसरण झाली तर बॅंक ऑफ बडोदाचा शेअर ०.२५ अंशांनी वधारला. दरम्यान बीएसई मिडकॅप १५६ अंशांनी घसरुन बंद होत १५ हजार ७५ अंशांवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप ८५ अंशांच्या घसरणीसह १४ हजार ५७२ अंशांनी बंद झाला.

 

दिवसभरात निफ्टी १० हजार ७०० अंशांच्या स्तरावर पोहोचला होता. १२० अंशांच्या घसरणीसह निफ्टी १० हजार ६७२ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये ऑटो, बॅंकींग आणि एनर्जी क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण झाली. केवळ आठ शेअर वधारले उर्वरित ४२ शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मिडकैप-५० १.११ टक्क्यांनी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये कॉक्स किंग ५.७२ टक्के, इंफो एज इंडिया ४.६० टक्के, इंडिया ग्लास ३.८१ टक्के, उज्जीवन फायनान्स ३.८१ टक्के, ओरिएन्ट सिमेंट ३.६३ टक्के तेजीत दिसून आले तर निफ्टीमध्ये भारती इन्फ्राटेल लिमिटेड ३.३१ टक्के, टायटन ०.३१ टक्के, एचसीएल ०.२८ टक्के तेजी दिसून आली.

 

दरम्यान सेन्सेक्समध्ये बीएसईमध्ये देना बॅंकमध्ये १९.७८ टक्के, जिंदाल स्टीलमध्ये ७.०५ टक्के, विजया बॅंक ६.७६ टक्के, जेट एअरवेज ६.४१ टक्के, रिलायन्स इन्फ्रा ५.४६ टक्के घसरण नोंदवण्यात आली. निफ्टीमध्ये आयशर मोटार्स ४.२२ टक्के, एचपीसीएल ३.४७ टक्के, ओएनजीसी ३.४३ टक्के, इंडियाबुल्स फायनान्स ३.३६ टक्के आदी शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@