आचरेकरांना निरोप ‘देवा’च्या डोळ्यात अश्रू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्कच्या भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक क्रिकेटपटू आणि मान्यवर उपस्थिती होते. सचिनने आपले गुरू आचरेकर सर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी सचिन आणि सारेच क्रिकेटरसिक अत्यंत भावुक झाले.

 

रमांकात आचरेकर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अनेक दिवस त्यांना द्रवस्वरुपातील आहार दिलवा जात होता. मात्र बुधवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

कडक शिस्त आणि योग्य मार्गदर्शनामुळे रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांना घडवले. यात भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू यांच्यासारख्या अनेक खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@