एसटीतील निवृत्तांसाठी खुशखबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : एसटी महामंडळाच्या १ एप्रिल २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमीदेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचेअध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यांना २४० कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येईल.

रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात आजमहामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल,एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारीअशोक फळणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रावते यांनी जून २०१८मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारेहजार ८४९ कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली.

 

या वेतनवाढीचा लाभपूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे एप्रिल २०१६पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. एप्रिल २०१६ ते जून २०१८ दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला होता. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णयआज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@