प्रसिद्ध व्यावसायिक संजय अगरवाल यांची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |



मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय अगरवाल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चेंबूर परिसरात ते संजुना बिल्डर म्हणून ओळखले जात होते. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता चेंबूरमधील आपल्या कार्यालयात अगरवाल यांनी स्वत: च्या परवानाधारक बंदुकीमधून गोळी झाडून घेतली. स्वतःवर गोळी झाडात असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचा मुलगा, मेहुणा आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

 

गेल्या काही दिवसांपासून अगरवाल त्यांच्या चेंबूर परिसरातील १० व्या रस्त्यावरील इमारतीच्या बांधकामास होत असलेल्या विलंबामुळे तणावात होते, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांनी या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनाकरीता त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@