अॅक्सिस बॅंकेचे गृहकर्ज महागले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |


मुंबई : अॅक्सिस बॅंकेने बेस रेटमध्ये ०.३० टक्क्यांनी वाढ केली असून जानेवारीपासूनच नव्या गृहकर्जाचे दर लागू केले आहेत. बॅंकेने ९.२ टक्क्यांनी वाढूवून ९.५ टक्के केले आहेत. दरम्यान सध्या एचडीएफसी ९.३ टक्के आणि आयसीआयसीआय बॅंकेने ८.८५ टक्क्यांनी कर्जाचे दर ठेवले आहेत. एसबीआय ९ टक्क्यांनी गृहकर्ज देते.

 

बॅंक ऑफ बडोदाचे व्याजदर ९.४ टक्के करण्यात आले आहेत. अॅक्सिस बॅंकेने एमसीएलआर दर कायम ठेवले आहेत. तर कर्नाटक बॅंकेने एमसीएलआर दरांत ०.१५ टक्के वाढ केली आहे. बिगर बॅंकींग कंपनी एचडीएफसीने कर्जदर ०.१ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे.

 

दरम्यान नुकतेच क्रिफ हाय मार्क या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गृहकर्ज घेण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून देशातील एकूण गृहकर्जांपैकी निव्वळ २५ टक्के कर्ज ही महाराष्ट्रातील आहेत, असा अहवाल दिला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@