राज्यात ९३१ गावात दुष्काळ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2019
Total Views |



मुंबई - कमी आणेवारी आणि पर्जन्यमान कमी असणाऱ्या ९३१ गावात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ निवारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची गुरुवारी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या ५० मंडळातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला.

 

मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, "पाणी टंचाई असलेल्या राज्यातील आणखी काही गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यामुळे ज्या मंडळामधील गावांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे व कमी पर्जन्यमान आहे, अशा गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे. या गावांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत."

 

यापूर्वी जाहीर केलेल्या गावांमध्ये दुष्काळ निवारण उपाय योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या मंडळातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कर्ज वसुलीलाही स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. तसेच बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची थकित वीजबील भरुन त्या योजना सुरू करण्यात येत आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरुपातील नव्या योजना सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. चारा उत्पादन वाढवावे, यासाठी गोरक्षण संस्थांनाही नाममात्र दरात गाळपेर जमिनी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@