नवजात बालकांना मिळणार ‘मुख्यमंत्री शिशू कीट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |



मुंबई : बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील नवजात बालकांच्या संगोपनासाठी मुख्यमंत्री शिशू कीट देण्यात येणार आहे. या शिशू कीटमध्ये ब्लँकेट, मच्छरदाणी, छोटा नेलकटर, इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, झोपण्याची लहान गादी, प्लास्टिक लंगोट, हातमोजे, पायमोजे इत्यादी साहित्याचा समावेश असणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

 

मुख्यमंत्री शिशू स्वागत किट योजना म्हणून ही योजना ओळखली जाईल. प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे किट मोफत देण्यात येणार आहे.

 

मंत्रालयात आज झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांच्या हस्ते काही गरोदर महिला आणि स्तनदा मातांना या मुख्यमंत्री शिशू स्वागत किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, "नवजात बालकांना उब मिळेल, त्याची स्वच्छता राखली जाऊ शकेल अशा प्रकारच्या साहित्याची कीट नवजात बालकांना शासनामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपयांची उपलब्धता करण्यात आली असून भविष्यात ही तरतूद वाढविण्यात येईल. राज्याच्या सर्व भागात तसेच सर्व सामाजिक घटकांसाठी ही योजना लागू असेल."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@