सामूहिक योगदानातून सहकारी संस्था मजबूत व्हावी : सुभाष देशमुख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
ठाणे : “अनुदानातून नव्हे, तर योगदानातून संस्था मजबूत करायची, हे ब्रीदवाक्य सहकारी संस्थांनी जपले पाहिजे,” असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकारी संस्थांना केले. ‘सा.विवेक’तर्फे मंगळवारी आयोजित ‘सहकार संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी, ठाण्याचे आमदार डॉ. संजय केळकर, ‘सा. विवेक’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, ‘सा. विवेक’च्या कार्यकारी संपादक व बिझनेस हेड अश्विनी मयेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
 

यावेळी ‘सा.विवेक’च्या सहकार विशेषांकाचे प्रकाशन सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना, देशमुख यांनी सहकारी संस्थांनी स्वावलंबी होण्याची गरज प्रतिपादित केली. त्याचबरोबर ग्रामीण भागात पैशांची चणचण कायम असते. त्यातून बाहेर येण्यासाठी सहकारी संस्थांना योग्य प्रशिक्षण देण्याचे धोरण आपण अवलंबले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाच हजार सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर सोपवली असून २ हजार २०० विविध सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्यात आपल्याला यश आल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, “सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करायचा कानमंत्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला आहे,” असेही ते म्हणाले.

 
यावेळी उपस्थितांकडून आलेल्या सूचनेनुसार तीन महिन्यातून एकदा सहकार क्षेत्राशी संबंधित अधिकार्यांशी तालुकास्तरावर आणि जिल्हा स्तरावर चर्चा घडवून आणण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासनही त्यांनी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना दिले. यावेळी सहकार आयुक्त सतीश सोनी आपल्या भाषणात म्हणाले की, “सहकार चळवळ केवळ कायद्याचा दंडुका दाखवून नव्हे, तर सर्वांना सोबत घेऊन व्हायला हवी,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दिलीप करंबेळकर यांनी प्रास्ताविकात ‘विवेक’ समूहाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आणि विविध उपक्रमांचा लेखाजोखा मांडला. अश्विनी मयेकर यांनी ‘विवेक संवाद’ या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि सहकारावरील संवादातून या क्षेत्रासमोर असलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा उपक्रम यशस्वी होण्यात उद्योजक संजय ढवळीकर यांनी विशेष मेहनत घेतली.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@