दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून ४ हजार ७१४ कोटींचे पॅकेज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारने ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली. महाराष्ट्रासह इतर सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला राज्याला दुष्काळ निवारणासाठी मदत देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला.

पूर, भूस्खलन, ढगफुटी, गाजा वादळ आणि २०१८-१९ मधील दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या राज्यांना ७,२१४. ०३ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. यात सर्वातजास्त म्हणजे ४ हजार ७१४.२८ कोटी रुपयांची मदत एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशसाठी १९१.७२ कोटी रुपये, कर्नाटकसाठी ९४९.४९ कोटी रुपये, आंध्र प्रदेशसाठी ९००.४० कोटी रुपये, गुजरातसाठी १२७.६० कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी ३१७.४४ आणि पुद्दचेरीसाठी १३.०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भरगोस मदतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@