होमियोपॅथीक तपासणी (केसटेकींग) भाग-७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
होमियोपॅथीक तपासणी’ ही रुग्णाची नुसती जुजबी माहिती घेण्यापुरती मर्यादित नसते, तर त्या माणसाला पूर्णपणे जाणून घेण्याची प्रक्रिया असते. आजाराचा पूर्वइतिहास व रुग्णाच्या विविध सवयी जाणून घेताना ‘स्त्रीसुलभ लक्षणे’ व ‘लैंगिकतेविषयीची लक्षणे’ या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आवश्यक असते. या दोन्ही बाबी थोड्या संवदेनात्मक आहेत.
 
 
कुठलाही रुग्ण मोकळेपणाने या विषयांवर डॉक्टरांशी बोलत नाही. बरेचदा या संबंधीच्या तक्रारी, विकार अथवा लक्षणे ही डॉक्टरांपासून लपवून ठेवली जातात. यामुळे रुग्णाचेच नुकसान होते. स्त्रीसुलभ लक्षणांमध्ये मुख्यत: मासिक पाळीबद्दल माहिती घेतली जाते. मासिक पाळीची नियमितता किंवा अनियमितपणा तसेच मासिक पाळी येण्याअगोदर, पाळी चालू असताना आणि पाळी येऊन गेल्यावर स्त्रीच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत काही फरक पडतो का, याचा अभ्यास केला जातो. हे बदल संप्रेरकांच्या पातळीवर होत असल्याने ही माहिती महत्त्वाची असते. त्याचबरोबर श्वेतप्रदराचा (Leucorrhea) त्रास काही स्त्रियांना होत असतो, त्याबद्दलही माहिती घेतली जाते. 
 
प्रसुतीविषयक माहितीमध्ये-
 

प्रसुती सुरळीत झाली की, शस्त्रक्रिया करावी लागली?

 

शस्त्रक्रियेचे कारण?

 

गरोदरपणातील शारीरिक व मानसिक बदलांची लक्षणे.

 

गरोदरपणातील मानसिक ताण-तणाव व मानसिक स्थिती ज्याचा बाळाच्या शरीरावर व मनावरही परिणाम होत असतो, म्हणून ती जाणणे गरजेचे असते.

 

गरोदरपणातील व प्रसुतीनंतर होणारे आजार.

 

पूर्वी झालेले, करून घेतलेले गर्भपात व गर्भपात होण्याची शारीरिक प्रवृत्ती (Tendency) याचादेखील अभ्यास केला जातो.

 

गरोदरपणाच्या तपासणीत पूर्वी जर बाळामध्ये व्यंग दिसून आल्याचा इतिहास असेल, तर त्या प्रवृत्तीचाही अभ्यास केला जातो.

 

लैंगिकता विषयक लक्षणांमध्ये लैंगिकतेच्या इच्छेबद्दल माहिती घेतली जाते. (sexual desire)

अर्थात, ही सर्व माहिती रुग्णाला त्याविषयी काही तक्रारी असतील, तरच खोलात शिरून घेतली जाते अन्यथा नाहीलैंगिक संबंधांची इच्छा असणे किंवा नसणे किंवा दाबली जाणे याची माहिती घेतली जातेलैंगिक अशक्यता, पुरुषांमधील हस्तमैथुनसारख्या सवयी तसेच शीघ्रपतन, लिंग ताठरतेचा अभाव, वीर्यविषयक काही तक्रारी याचबरोबर वैवाहीक जीवनातील काही तक्रारी किंवा ताणतणाव याचाही मागोवा घेतला जातो. या सर्व तक्रारींकरिता रुग्ण कुठल्याही प्रकारची औषधे घेत आहेत का आणि शारीरीक व मानसिक पातळीवर त्या औषधांचे दुष्परीणाम होत आहेत का हेसुद्धा पाहिले जाते.

 

होमियोपॅथीक तपासणी’ ही एक अतिशय गोपनीय पद्धत आहे. रुग्णाने डॉक्टरांना दिलेली माहिती ही पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. कधीही रुग्णाचे नाव उघड केले जात नाही. डॉ. हॅतेपान यांनी मार्गदर्शक तत्त्वे देताना प्रत्येक होमियोपॅथीक तज्ज्ञाला गोपनीयतेची शपथ (OATH) घ्यायला लावली आहे. त्यामुळे रुग्णांनी संपूर्ण खरी माहिती देणे हे रुग्णासाठीच हितकारक असते.

 

- डॉ. मंदार पाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@