मल्ल्याच्या स्विस बँक खात्याची माहिती भारताला मिळणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |

 


 
 
 
नवी दिल्ली : भारतातील बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या स्विस बँकेतील खात्याची माहिती आता भारताला मिळणार आहे. विजय मल्ल्याच्या स्विस बँकेच्या खात्याची माहिती आणि तीन कंपन्यांची माहिती सीबीआयला देण्याचा निर्णय स्वित्झलँड सरकारने घेतला आहे.
 

स्वित्झलँड सरकारच्या या निर्णयाविरोधात विजय मल्ल्याने स्वित्झलँडच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु याप्रकरणी न्यायालयाने स्वित्झलँड सरकारच्या बाजूने निर्णय दिला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्विस बँकेत असलेल्या मल्ल्याच्या विविध ठेवी गोठविण्यात आल्या होत्या. विजय मल्ल्या २०१६ साली भारतातून पळून लंडनला गेला होता. काही दिवसांपूर्वी लंडनच्या उच्च न्यायालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता. आता विजय मल्ल्याच्या स्विस बँकेतील खात्यांची माहिती स्वित्झलँड सरकार भारताला देणार आहे. विजय मल्ल्याचे प्रकरण सध्या सीबीआय हाताळत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@