सेट टॉप बॉक्सची पोर्टेबिलीटी बदलता येणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : मोबाईल कंपनीकडून योग्य सुविधा न मिळाल्यास मोबाईलमदील सिमकार्ड बदलता येते. त्याचप्रमाणे आता जर केबल नेटवर्क ऑपरेटरने चांगल्या सुविधा दिल्या नाहीत. तसेच ती केबल कंपनी मनमानी कारभार करत असेल, तर सेट टॉप बॉक्समधील कार्ड बदलून दुसऱ्या केबल कंपनीचे कार्ड वापरता येणार आहे.
 

येणाऱ्या काळात ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) या प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे जे केबल ग्राहक त्यांच्या डीटीएच ऑपरेटर कंपनीच्या सेवेला कंटाळले आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सेट टॉप बॉक्समुळे केबल टीव्ही ग्राहकांना कंपनी बदलण्यात अडथळे येतात. ट्रायच्या या नव्या नियमामुळे केबल टीव्ही ग्राहकांची होणारी ही कुचंबणा थांबणार आहे. परंतु डीटीएच कंपन्या आणि केबल सेवापुरवठा करणाऱ्यांकडून ट्रायच्या या नव्या नियमांना तीव्र विरोध केला जात आहे. त्यामुळे या नव्या नियमांची अंमलबजावणी करणे, ट्रायला अवघड होणार आहे. या वर्षाअखेरीपर्यंत नवी नियमप्रणाली अमलात आणण्याचा प्रयत्न ट्राय करणार आहे.

 

सध्या प्रत्येक डीटीएच कंपनीचा सेट टॉप बॉक्स वेगवेगळा आहे. तसेच त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्याही बराच फरक आहे. त्यामुळे सेट टॉप बॉक्समधील कार्ड जर बदलले तर दुसऱ्या कंपनीची पायरसी होईल. तसेच इतर तांत्रिक गोष्टींचाही गोंधळ होईल. अशी शक्यता डीटीएच कंपन्यांकडून वर्तवली जात आहे. प्रत्येक डीटीएच कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधील सॉफ्टवेअर वेगवेगळे असल्यामुळे एका कंपनीच्या सेट टॉप बॉक्समधून दुसऱ्या कंपनीची सेवा पुरवणे कठीण जाईल. असे डीटीएच कंपन्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सेट टॉप बॉक्सशी छेडछाड केल्यास कंपन्यांची माहिती चोरीला जाण्याची शक्यतादेखील डीटीएच कंपन्यांकडून वर्तविण्यात आली आहे. डीटीएच कंपन्यांनी असा युक्तीवाद केल्यानंतर याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ट्रायने म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@