'पद्मश्री' मिळवणाऱ्या जर्मनच्या 'सुदेवी माता'ची गोष्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |



लखनऊ : 'हंबरून वासराले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले गायीमधी दिसती माझी माय' हे गाणे ऐकले की नेहमी उर भरून येतो. पण, जेव्हा त्याच 'माय'ला रस्त्यावर सोडले जाते तेव्हा काय? अशाच गायींची आई बनलेल्या जर्मनवासी 'फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग' यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा सत्कार केला. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जर्मन नागरिक फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला.

 

२५ वर्षांपूर्वी फ्रेडरिक या भारत फिरण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आल्या होत्या. मथुरेत फिरताना जमखी आणि भटकंती करणाऱ्या गायींचे हाल पाहून फ्रेडरिक यांचे मन हेलावून गेले. त्यांची ही दयनीय अवस्था बघून त्यांनी जर्मनीला परत न जाता, भटक्या गायींच्या गो-माता होण्याचा निश्चय केला. त्यांनी मथुरेत राहून गायींची सेवा करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. गजबजलेल्या वस्तीपासून एका शांत परिसरामध्ये त्या १८००पेक्षा अधिक गायी आणि त्यांच्या वासरांचा सांभाळ करत आहे. त्यामुळे, येथील स्थानिक लोक त्यांना 'सुदेवी माताजी' असे म्हणतात.

 

वयाच्या ६१व्या फ्रेडरिक ब्रुनिंग या १८००हुन अधिक गायींचा सांभाळ करत आहेत. त्यांच्या या गोशाळेत ६० कर्मचारी काम करतात. त्यांना दरमहा ३५ लाख रुपयांचा खर्च येतो. विशेष म्हणजे, फ्रेडरिक यांनी अंध आणि जखमी जनावरांसाठी स्वतंत्र वाडा उभारला आहे. "मी एका छोट्याशा अंगणात या गोशाळेची सुरुवात केली होती. त्यानंतर, राधाकुंड येथील सुरभी गोशाला निकेतन नावाने एका गोशाळेची उभारणी केली. माझ्याजवळ असलेला सगळा पैसा मी या गोशाळेच्या उभारणीसाठी लावले. या पुरस्कारामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे." अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@