नितीन केळकर यांना एफआयई फाऊंडेशनचा कल्पकता पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jan-2019
Total Views |



नाशिक : सुनीता इंजिनियरिंग कॉर्पोरेशन आणि केळकर डायनॅमिक्सचे नितीन केळकर यांना सलग चौथांद्या एफआयई फाऊंडेशनचा कल्पकता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे नाशिक आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे बंगळुरू येथे आयएमटेक्स २०१९ या प्रदर्शनीमध्ये दि. २९ जानेवारी रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नितीन केळकर यांनी अतिशय कल्पकतेने आणि मेहनतीने तयार केलेल्या या कम्प्युटराईज्ड न्यूमरिकल कंट्रोल या मशीनचे पेटंटही त्यांना मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर यंत्राची किंमत परदेशात कोटी रुपयांच्यावर असून नितीन यांनी बनवलेल्या यंत्राची किंमत त्या किमतीपेक्षा १/३ पटीने कमी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@