पंतप्रधानाची 'मन की बात' ; शहिदांना वाहिली आदरांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी आज ५२ व्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. तर ३० जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त देशवासीयांनी २ मिनिटे मौन बाळगून शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचेही आवाहन यावेळी केले. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी शासनाच्या नवीन योजनांची माहिती देत असतात. यावेळी त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या देशप्रमाच्या कार्याला उजाळा दिला. दिल्ली येथील बोस यांच्या संग्रहालयाबद्दलही त्यांनी यावेळी माहिती सांगितली. हे संग्रहालय बनवण्यात मोदी सरकारचा मोठा हातभार लागला असल्याचेही त्यांनी यावेळी. तर, बोस यांच्या जीवनाशी संबंधित अज्ञात कागदपत्राचांही उलगडाही त्यांनी जनतेसमोर केला. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्याविषयीही त्यांनी माहिती यावेळी दिली.

 

नेताजींनी रेडिओच्या माध्यमातूनही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे कार्य केले. त्यावरुनच आपण मन की बात कार्यक्रम करण्यास प्रोत्साहित झालो, असा खुलासाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला. तर, अंतराळ क्षेत्रातही भारत सामर्थ्य वाढत आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगत अंतराळ संशोधन क्षेत्रावरही प्रकाश टाकला. कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला म्हणून त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी 'सुंदर शौचालय' या स्पर्धेची माहिती देत शौचालये सजवणाऱ्या नागरिकांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले. ३० जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने देशातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. आपण आहात त्या जागी राहून २ मिनीटे मौन पाळून शहिदांना आदरांजली वाहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@