जोकोव्हिचने पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019
Total Views |



मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपनच्या एकेरी पुरूष गटात सर्बियाच्या नोआक जोकोव्हिचने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला. जोकोविचने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्याने नदालचा ६-३, ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोव्हिचचे हे विक्रमी सातवे विजेतेपद आहे. या विजयासह जोकोव्हिचने आपल्या कारकीर्दमधील १५ वी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.

 

नोआक जोकोव्हिचने सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पहिला सेट ६-३ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही राफेल नदालला पुनरागनम करण्याची संधी जोकोव्हिने दिलीच नाही. त्याने दुसरा सेटही ६-२ असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळाची लय राखत जोकोव्हिचने ६-३ असा सरळ सेट जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनच्या करंडकावर नाव कोरले.

 

राफेल नदाल आणि नोआक जोकोव्हिच या दोन दिग्गजामध्ये अंतिम सामना होणार असल्याने चाहत्यांमध्ये कोण जिकंणार याबाबतीत प्रचंड उत्सुकता लागली होती. मात्र, नोआक जोकोव्हिचने हा सामना एकतर्फी जिंकला. या खेळाडूंमध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम लढत विक्रमी ५ तास ५३ मिनिट रंगली होती. ग्रँडस्लॅम इतिहासातील ही सर्वांत लांब काळ रंगलेली अंतिम लढत होती. अशीच लढत आज पाहायला मिळेल, अशी आपेक्षा असताना मात्र, नोआक जोकोव्हिचने एकतर्फी विजय मिळवला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@