संरक्षण मंत्र्यांनी माजी सैनिकांसोबत पाहिला ‘उरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
बेंगळुरु : देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काही माजी सैनिकांसोबत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा पाहिला. बेंगळुरुमधील सेंटर स्पिरीट मॉलमधील सिनेमागृहात त्यांनी हा सिनेमा पाहिला. ‘उरी’ हा सिनेमा पाहिल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी सिनेमातील कलाकारांचे कौतुक केले. ‘उरी’ सिनेमा पाहण्यासाठी माजी सैनिक उत्सुक होते.
 
 
 
 

सिनेमा पाहिल्यावर निर्मला सीतारमण यांनी सिनेमागृहात ‘हाऊ वॉझ द जोश’ म्हणत घोषणा दिल्या. काही दिवसांपूर्वी निर्मला सीतारमण यांनी ‘उरी’ सिनेमातील कलाकारांची भेट घेतली होती. भारतीय लष्कराच्या स्थापना दिनानिमित्त लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ‘उरी’ सिनेमातील विकी कौशल, यामी गौतम, परेश रावल आणि आदित्य धर या कलाकारांचे निर्मला सीतारमण यांनी कौतुक केले. कलाकारांनी जवानांच्या भावना पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून संरक्षण मंत्र्यांनी कलाकारांना शाबासकी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@