भाजपप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jan-2019
Total Views |



मुंबई : भाजपतर्फे रविवारी वाहतूक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या देशव्यापी संघटनेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय वाहतूक व दळणवळणमंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या या वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. संघटनेच्या पहिल्या अध्यक्षपदाची धुरा हाजी अराफत शेख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

 

मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे हा सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांनी भाजपत प्रवेश केला. कोप्पीकर यांची या संघटनेच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संघटनेच्या बोधचिन्ह, संकेतस्थळ व टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले. भाजप खा. अमर साबळे हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्रात पाच लाख कोटींचे रस्ते बांधण्यात येत आहेत ज्याचा फायदा वाहतुकीला होणार आहे. दिल्लीमध्ये सहा ते १२ मार्गिकांचे रस्ते बांधण्यात येत आहेत. ट्रक वाहतूक ही दिल्लीपर्यंतही सहजपणे करता येईल, असे दर्जेदार रस्ते भारतात तयार होत आहेत,” असे त्यांनी सांगितले. “ट्रकचे इंजिन इथोनॉलवर चालावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे ते विरारपर्यंत जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असून सध्याच्या वाहतूक यंत्रणेवर पडणारा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असे गडकरी म्हणाले.

 

“दरवर्षी देशात पाच लाख अपघात होतात, दीड लाख लोकांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. कारण मीपण ट्रकअपघातात मृत्यूच्या दारातून परत आलो आहे,” असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. जट्रोफा तेलापासून देशातील विमाने उड्डाण करतील, त्यादृष्टीनेही सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ईशा कोप्पीकर यांनी देशातील सर्वात मोठ्या अशा या परिवारात मी प्रवेश करते आहे, याचा आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या विचाराने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम करत राहू, असे त्यांनी नमूद केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@