राष्ट्रीय मतदार दिन; युवकांचा फिर मोदी सरकारचा नारा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : आज आपल्या देशात राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नव्याने मतदार झालेल्या तरुणांसाठी हा महत्वाचा दिवस असला तरी हे सर्व तरुण मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच भाग म्हणजे सोशल मीडियावर #YouthWithModi हा ट्रेंड मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

 

ट्विटरवरील #YouthWithModi या ट्रेंडमध्ये देशातील युवक पंतप्रधान मोदी भारत देशासाठी कसे महत्वाचे आहेत हे कोणी कवितांमधून तर कोणी ट्विट करून सांगत आहेत. आमचा पंतप्रधान मोदींवर पूर्ण विश्वास असून देशाची प्रगती करायची असेल तर पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणे गरजेचे असल्याचा नारादेखील लाखो युवक देत आहेत.

 

मतदार दिनाचा इतिहास

 

भारत सरकारने २०११ पासून २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचे ठरवले. नागरिकांचे निवडणुकीत योगदान वाढावे हा यामागील उद्देश होता. यावर्षीचा भारताचा हा ९ वा मतदार दिन असणार आहे.

 

२५ जानेवारीच का?

 

भारतभर २५ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर मतदार दिन का साजरा केला जात असेल? दुसरा एखादा दिवस नव्हता का? मात्र, भारताने आपले संविधान स्वीकारण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची स्थापना केली होती.

 

कसा साजरा केला जातो मतदार दिन?

 

देशभरातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर हा मतदार दिन साजरा केला जातो. यादिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण करून नव्याने मतदार झालेल्या तरुणांना मतदान ओळखपत्र समारंभपूर्वक दिले जाते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@