जी.टी.पाटील महाविद्यालयात ‘दृष्टी’ अंतर्गत जागतिक कौशल्यावर कार्यशाळा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |
 
 
 
नंदुरबार : 
 
येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे तीनदिवसीय जागतिक कौशल्य या विषयावर 21-23 जानेवारी दरम्यान आयोजन लँग्वेज लॅबमध्ये करण्यात आले होते.
 
 
जागतिकीकरणाच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये विविध जागतिक कौशल्य आत्मसात व्हावे, या उद्देशाने ‘दृष्टी’ या उपक्रमाअंतर्गत सदर कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.
 
 
दृष्टी हा उपक्रम नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी अध्यक्ष स्व. दादासाहेब रघुवंशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2015 पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
 
 
कार्यशाळेत स्पर्धात्मक कौशल्य व प्रशासकीय कौशल्य, टिमवर्क, सायबर सेक्युरिटी या विषयांवर इंग्रजी विभागाचे लेफ्ट डॉ.विजय चौधरी व प्रा.दिनेश देवरे यांनी पॉवर पॉईंट स्लाईड शो व विविध चित्रफितीव्दारे मार्गदर्शन केले.
 
 
कार्यशाळेत 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, विभाग प्रमुख प्रा.नरेंद्र मराठे, प्रा.बी.के. महाले, डॉ.डी.डी.गिरासे, प्रा.अरुण आखाडे, सहसमन्वयक प्रा.दिनेश देवरे व समन्वयक डॉ.विजय चौधरी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@