शिंदखेडा येथे अभाविपतर्फे १,१११ फूट लांबीची ‘तिरंगा’ यात्रा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |
 
 
 
शिंदखेडा, २५ जानेवारी
शहरातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १,१११ फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेचे आयोजन २५ रोजी करण्यात आले होते. पदयात्रेचा समारोप गांधी चौकात करण्यात आला.
 
 
तिरंगा पदयात्रा एन. डी. मराठे विद्यालयातून सकाळी १० वाजता ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते भारत माता व शहीद जवान योगेश भदाणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून काढण्यात आली. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, एस.आर.गोईल, एस.आर.पाटील, नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, गटनेते अनिल वानखेडे, जि. प. सदस्य कामराज निकम, तहसीलदार सुदाम महाजन मुख्याधिकारी अजित निकम, नगरसेवक यासह शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी प्राध्यापक, नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
 
 
यावेळी ना. जयकुमार रावल यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले तसेच तालुक्यातील सैनिक हे देशाच्या सीमेवर लढताना शहीद झाले. देशाला परमवैभवावर नेण्यासाठी भारत मातेला नमन करून जगात भारताचे नाव परमवैभवाला नेऊ या, असे सांगितले.
 
 
पदयात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. पदयात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
 
 
पदयात्रा ही एन.डी. मराठे विद्यालयापासून स्टेशन रोडवरून गांधी चौक, मेन रोड, माळीवाडा, हेंडल चौक येथून गांधी चौकात समारोप करण्यात आला.
या समारोपप्रसंगी रवींद्र पाटील यांनी सांगितले की, हा तिरंगा आमची आन, बान, शान आहे. अभाविपचे जिल्हाप्रमुख अमोल मराठे यांनी प्रास्ताविकात तिरंगा पदयात्रेचे महत्त्व व त्यामागची भूमिका विषद केली. यावेळी व्यासपीठावर शहरमंत्री वैभव चौधरी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@