शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |



११२ पद्म पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील १२ व्यक्तींचा समावेश


नवी दिल्ली : ‘भारतरत्न’खालोखाल देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणारे पद्म पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ११२ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील १२ व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील उद्योजक अनिलकुमार नाईक व शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण तसेच, लातूरच्या विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अशोकराव कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

शुक्रवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या या पद्म पुरस्कारांमध्ये चार पद्मविभूषण, १४ पद्मभूषण व ९४ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये २१ महिलांचा समावेश आहे. येत्या मार्च अथवा एप्रिलमध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात या सर्व मान्यवरांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतील. महाराष्ट्रातील ‘शिवशाहीर’ बाबासाहेब पुरंदरे, अनिलकुमार नाईक यांना पद्मविभूषण, डॉ. अशोकराव कुकडे यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आला असून अभिनेता मनोज वाजपेयी, नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे, गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण ९ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचे देशातील सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@