डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ कुकडे हे गेल्या अनेक दशकांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कामाने त्यांनी नवा आदर्श निर्माण केलाय. राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले डॉ. कुकडे यांनी वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर समाज कार्यात झोकून दिले. डॉ. कुकडे यांनी १९६० च्या सुमारास पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ते एम.एस. असून त्यांच्या पत्नी जोत्सना कुकडे याही स्त्री रोग तज्ज्ञ आहेत.

 

"मी त्यांचा विद्यार्थी होतो. ते शिक्षक म्हणून चांगले होते. त्यांनी समाजाप्रती खूप मोठे योगदान दिले आहे. लातूरच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न हे एक त्यांच्या कामाचे उदाहरण देता येईल. सेवा संपल्यानंतर उरलेलं आयुष्य ऐशिराममध्ये घालवायचे असा ट्रेंड सध्या समाजामध्ये पाहायला मिळतो आहे. मात्र तुमची सेवा संपल्यानंतरही तुम्ही खूप काही करू शकता हे काकांनी दाखवून दिले आहे. त्यामूळे काकांना भारतरत्न मिळाल्याने त्यांच्या कामाचा सन्मानच झाला आहे."

 

- डॉ. राजेंद्र खैरे (श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक )

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@