नवापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |
 
 
नवापूर : 
 
श्री सुरूपसिंग हिर्‍या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.
 
याप्रसंगी आपल्या देशाचा विकास व हित फक्त विद्यार्थी व शिक्षकांच्या हातात आहे, म्हणून देशाला हेच वाचवू शकतात, असे प्रतिपादन प्रा. नितीन बारी यांनी केले.
 
याप्रसंगी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. देशाचा अभिमान हा हृदयात असेल तर देशप्रेम विषयी सजकता निर्माण होईल, असे विचार डॉ शिवाजीराव पाटील यांनी मांडले.
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लता मोरे होत्या. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील, डॉ.आर.बी.भोळे होते. प्रस्ताविक डॉ. जगदीश काळे यांनी केले.
 
 
सूत्रसंचालन प्रा. डॉ. नितीनकुमार माळी व आभार किशोर सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.पुष्पा पाटील, डॉ. मंदा मोरे, डॉ.गौरी पाटील, प्रा.फिलिप गावीत व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
@@AUTHORINFO_V1@@