खडगावला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |


 
 
खडगाव, ता.चोपडा :
 
 
येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येतो. याप्रसंगी गावात दरवर्षी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि एकोपा या उद्देशाने सुरू केलेल्या ग्रामोत्सवाचे हे आठवे वर्ष होते.
 
या कीर्तन सप्ताहात आठ दिवस वारकरी संप्रदायातील विशेष नावलौकिक असलेले कीर्तनकरांच्या कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ह. भ. प. कुमावतकर महाराज यांच्या सहकार्याने आयोजन केले गेले.
 
 
दरवर्षाप्रमाणे या वर्षीदेखील कीर्तनाचा आस्वाद ग्रामस्थांनी घेतला. तसेच सातव्या दिवशी गावात व पंचक्रोशीत दिंडीचे (पालखी) आयोजन करण्यात आले. समस्त ग्रामस्थ, महिला, तरुण या दिंडीत विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले.
 
 
या ग्रामोत्सवाचा समारोप ह. भ. प. उंटावदकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. या प्रसंगी ग्रामस्थ, गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सहभाग लाभला. तसेच पोलीस पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
@@AUTHORINFO_V1@@