महिलांचे शौचालय बांधण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |

 
 
पारोळा : 
 
शहरातील राम मंदिर चौकात महिलांंसाठी नवीन शौचालय बांधण्यात यावे तसेच शौचालयाची दुरवस्था सुधारण्यात यावी, यासाठी पारोळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन माने यांना निवेदन देण्यात आले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुवर्णा पाटील शहराध्यक्ष संजय बागडे, शहर उपाध्यक्ष चेतन पाटील, अमोल पाटील, ईश्वर पाटील, निजाम मुजावर व शहरातील राम मंदिर चौकातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
@@AUTHORINFO_V1@@