एक लाख ३१ हजार सूर्यनमस्‍कारांचा अनोखा विक्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
कल्‍याण : कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका महिला व बाल कल्‍याण समिती, सुभेदारवाडा कट्टा आणि माध्‍यमिक-उच्‍च माध्‍यमिक मुख्‍याध्‍यापक संघटना, कल्‍याण यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आज राष्‍ट्रीय सूर्यनमस्‍कार दिनानिमित्‍त कल्‍याणच्‍या शाळांमधील १०,१२१ विद्यार्थ्‍यांनी एकत्रित मिळून ,३१,५७३ एवढे सामुहिक सूर्यनमस्‍कार घालून विक्रम केला. हा कार्यक्रम कल्‍याण पश्चिम येथील सुभाष मैदान येथे सकाळी ८.०० वा. सुरु झाला.
 
या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार नरेंद्र पवार, कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे, उप महापौर उपेक्षा भोईर, महिला व बाल कल्‍याण समितीचे सभापती रेखा चौधरी उपस्थित होत्‍या. विशेष म्‍हणजे यावेळी खुद आमदार नरेंद्र पवार, महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या सदस्‍या खुशबु चौधरी, संगिता गायकवाड, दमयंती वझे, शिक्षक विलास निखारे यांनी देखील सुर्यनमस्‍कार घातले. हा कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी मुख्‍याध्‍यापक संघ कल्‍याणचे अध्‍यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील, सरस्‍वती हायस्‍कुलचे अंकुश चौधरी, लुड्स हायस्‍कुलचे विलास वाघ, क्रीडा भारतीचे सचिव महादेव क्षीरसागर यांचेही सहकार्य लाभले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@