महाराष्ट्राच्या दोन बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


नवी दिल्ली : ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०१९’ या पुरस्काराचा मान महाराष्ट्रातील दोन बालकांना मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्कृत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पुरस्कारासाठी एकूण ३१ बालकांना नेमण्यात आले होते. तर, बाल शक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार असे २ प्रकारचे पुरस्कार बालकांना देण्यात आले.

 

कला व संस्कृती या विभागात तृप्तराजला तर एन्जेल हीला क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, १ लाखांपर्यंत रोख, १० हजारांचे बुक व्हाऊचर्स आणि प्रशस्तिपत्र, असे आहे. प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या गणराज्य दिनाच्या विशेष परेडमध्ये सर्व पुरस्कार विजेते सहभागी होणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९ च्या विजेत्या बालकांशी संवाद साधला. यावेळी सर्व मुलांनी त्यांची कामगिरी आणि प्रेरणादायक गोष्टी पंतप्रधानांना सांगितल्या. पंतप्रधानांनी सर्व विजेत्यांच्या पराक्रमाचे कौतुक करत पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. या पुरस्कारांमुळे मुलांना त्यांच्यातले कौशल्य पारखण्याची संधी मिळाली आहे, असे सांगत हे पुरस्कार इतर सर्व मुलांना प्रेरणा देणारे ठरतील, असे पंतप्रधान म्हणाले.

 
 
 
निसर्गाने या मुलांना दैवी देणगी दिली आहे. अशा मुलांनी निसर्गाशी जोडलेले रहावे,” असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला. राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन विभागात दिले जातात. वैयक्तिक पराक्रम किंवा कर्तृत्व गाजवणाऱ्या मुलांना बालशक्ती पुरस्कार, तर मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींना बालकल्याण पुरस्कार देऊन गौरवले जाते.  
 
 
 

यावर्षी बालशक्ती पुरस्कारासाठी ७८३ नामांकने आली होती. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने त्यापैकी २६ जणांची पुरस्कारासाठी निवड केली. अभिनव कल्पना, बुद्धिमत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाज सेवा आणि शौर्य अशा विविध क्षेत्रांत अलौकिक काम करणाऱ्या मुलांना पुरस्कार देण्यात आले. तर, बालकल्याण पुरस्कारासाठी निवड समितीने तीन संस्था आणि दोन व्यक्तींची निवड केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@