यासाठी साजरा केला जातो 'राष्ट्रीय बालिका दिवस'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |
 

आज गुरुवार २४ जानेवारी २०१९, राष्ट्रीय बालिका दिवस. महिला सशक्तीकरण आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. मुलींचे शिक्षण त्यांची सुरक्षा आदींबाबत जागरुकता करण्याच्या दृष्टीने आजच्या दिवशी देशभरात विविध उपक्रम घेतले जातात. या वर्षीच्या राष्ट्रीय बालिका दिवसाची “Empowering Girls for a Brighter Tomorrow” अशी थीम आहे. 

 

देशभरातील मुलींचे सशक्तीकरणासाठी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस ११ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मुलगा मुलगी असा भेदभाव, मुलींच्या शिक्षणातील बाधा, असमानता, पोषण प्रश्न, सुरक्षा, सम्मान, बाल विवाह आदी गैरप्रकार रोखण्यासाठी २००९ मध्ये या दिवसाची सुरुवात करण्यात आली. 


 
 

२४ जानेवारी या दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आठवण आणि नारी शक्तीचा गौरव म्हणून आजच्या दिवसाला महत्व आहे. आजच्या दिवशी त्या पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. राष्ट्रीय स्तरावरील त्यावेळी ही महत्वाची घटना म्हणून आजच्या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन घोषित करण्यात आला. महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे हा दिवस साजरा केला जातो. देशाचा मान जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या या दहा महिलांविषयी आज जाणून घेऊयात

 
 

सुमित्रा महाजन : राजकारणात भारताच्या मुली कुठेही मागे नाहीत. सध्याच्या घडीला सुमित्रा महाजन यांचे नाव घेता येईल. ज्या सध्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत. त्या अशा संसदपटू आहेत कि ज्यांनी राजकीय कारकीर्दीत एकदाही निवडणूकीत पराभव पाहीला नाही. त्यांच्या जवळचे लोक त्यांना लाडाने ताई म्हणून हाक मारतात. त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती यावरूनच येईल.


 
 
 

अरुंधती भट्टाचार्य : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्वतंत्र संचाकल पदावर आहेत. औद्योगिक क्षेत्रात त्यांनी गेली ४० वर्षे विविध पदांवर काम पाहीले आहे. १९७७सालापासून त्या बॅंकींग क्षेत्रात कार्यरत आहेत. चार दशकांचा अनूभव गाठीशी असलेल्या भट्टाचार्य यांनी एसबीआयमधील कार्यकाळात बुडीत कर्जे, कर्ज वितरण आदींवर तोडगा काढला होता.

 

 
 

दीपा कर्माकर : ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपूरा राज्यात जन्म झालेल्या दीपा हिने ५२ वर्षानंतर भारताला ऑलम्पिकमध्ये जिमनॅस्ट प्रकारात स्थान मिळवून देत देशाला सन्मान मिळवून दिला. भारताला पदक मिळाले नाही. परंतू, या खेळात गेल्या ५२ वर्षात भारताकडून सहभाग घेतलेली ती पहिल्या खेळाडू ठरली.

 
 
 

साक्षी मलिक : डीटीसीमध्ये बस वाहकाचे काम पाहणाऱ्या सुखबीर मलिक यांची मुलगी साक्षी मलिक हीचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ रोजी झाला. २०१६ मध्ये झालेल्या रिओ ओलम्पिकमध्ये सहभाग घेत तिने चांगली कामगीरी केली.

 
 

पी. टी. उषा : आपल्या वेगाने जगाला मागे सारून उडाण भरणाऱ्या या महिला खेळाडूने १९८५ साली देशाला पाच सुवर्ण पदके मिळवून दिली होती.

 
 

सानिया मिर्झा : १५ नोव्हेंबर १९८६ रोजी जन्म झालेल्या सानियाने टेनिस स्पर्धेतून यश मिळवत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवित केले होते.

 
 

कल्पना चावला : १७ मार्च १९६२ मध्ये हरियाणासारख्या राज्यात जन्म झालेल्या कल्पना चावला यांनी त्यांच्या अंतराळातील भरारीने देशाला गौरव प्राप्त करून दिला. हरियाणात जिथे मुळातच मुलींचा जन्मदर कमी आहे, अशा राज्यातून येणाऱ्या कल्पनाने लहानपणापासूनच अंतराळात उड्ड्ण करण्याचे स्वप्न पाहीले होते. १९९८ रोजी नासाच्या पथकात तिने सहभाग घेतला होता.



 
 
 

गीता फोगाट : राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये स्वर्णपदक जिंकलेल्या गीता फोगाटला आज पूर्ण देश ओळखतो. मात्र, तिच्या जन्मावेळी तिच्या पालकांना मुलगा हवा होता. २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एमिली बेन्स्टेडला हरवून ती या स्पर्धेत स्वर्णपदक जिंकणारी पहीली भारतीय बनली. हरियाणात जिथे स्त्रीभ्रुण हत्या मोठ्या प्रमाणावर होतात. तिथून येऊन जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.


 
 

मनुषी छिल्लर : हरियाणातूनच आलेली एक मॉडेल, मिस इंडिया त्यानंतर २०१७ मध्ये मिस वर्ल्ड हा किताब आपल्या नावावर करणारी मनुषी छिल्लर हिने आपल्या सौंदर्यासह बुद्धीमत्तेनेही साऱ्यांना अवाक करून सोडले होते. त्यापूर्वी २००० मध्ये प्रियांका चोप्राने हा किताब पटकावला होता. तब्बल ११८ सौंदर्यवतींना मागे टाकत मनुषीने ही कामगिरी केली होती. याशिवाय तिला नृत्य, गायन, चित्रकला आदींचे छंद आहे.

 
 
 

मेरी कॉम : मणिपुरमध्ये एका गरीब शेतकरी कुटूंबात जन्म झालेल्या मेरी कॉमने आपल्या चिकाटी आणि मेहनतीने २०१२ मध्ये ऑलम्पिक प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. जागतिक बॉक्सिंगमध्ये ती पाच वेळा विजेती ठरली होती. आशियाई स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@