लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना अशोक चक्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील बटगुंड गावात दहशतवाद्यांशी लढताना विरमरण आलेल्या लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना २०१९ चे अशोक चक्र प्रदान करण्यात येणार आहे. या धुमश्चक्रीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. अशोक चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

 

लान्स नायक नाझीर अहमद वाणी देशासाठी यांनी लढताना सर्वोच्च त्याग केला, असे राष्ट्रपती सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे. नाझीर अहमद यांना दोन वेळा सेना पदकाने गौरविण्यात आले होते. २३ नोव्हेंबर २०१८ रोजी दहशतवाद्यांची माहीती गुप्तचर विभागाकडून त्यांना मिळाली. बटगुंड या गावात हिजबूल आणि लष्कर या संघटनेचे सहा दहशतवादी शस्त्रांसह लपून बसले होते. त्यासाठी वाणी ३४ राष्ट्रीय रायफलसह गेले होते. वानी आणि त्यांच्या गटाने दहशतवाद्यांशी जोरदार लढत दिली. दहशतवाद्यांचा पळून जाण्याचा रस्ता त्यांनी रोखून धरला. धोक्याची चाहूल लागताच दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला.

 

हात बॉम्बचा मारा करण्यात आला. या परिस्थितीत वाणी यांनी एका दहशतवाद्याला यशस्वीपणे टिपले. दुसऱ्या दहशतवाद्याला त्याच्या लपलेल्या जागी जाऊन त्यांनी ठार केले. पण, तोपर्यंत ते जखमी झाले होते. त्यांच्या अंत्यविधीला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दहशतवादाचा मार्ग सोडून वाणी देशसेवा करण्यासाठी सैन्यात रुजू झाले. सैन्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठीच्या कारवाया केल्या होत्या. नाझीर अहमद वाणी हे २००४ साली प्रादेशिक सैन्याच्या १६२ व्या तुकडीत दाखल झाले होते. त्यांच्या पश्च्यात कुटूंबामध्ये पत्नी व दोन मुले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@