आंध्रप्रदेशमध्ये महाआघाडीला खिंडार पडण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |



अमरावती : प्रियंका गांधी-वॉड्रा यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केल्यानंतर इतर राज्यांमध्येही आता कॉंग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. भाजपविरोधात एकजूट झालेल्या महाआघाडीला त्यामुळे खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशमध्ये कॉंग्रेस स्वबळावर लढेल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने, या बद्दलची शक्यता वर्तवली असून लोकसभा निवडणुकांची तारीख येईपर्यंत महाआघाडी टिकेल का हा प्रश्न आहे.

 

काँग्रेसच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि आंध्र प्रदेश, कॉंग्रेसचे प्रभारी ओमान चण्डी यांनी पत्रकारांशी बोलताना येथील काँग्रेसची रणनीती स्पष्ट केली. राज्यात विधानसभेच्या १७५ जागा आणि लोकसभेच्या २५ जागा काँग्रेस आपल्या जोरावच एकटे लढवणार आहे, असे संकेत त्यांनी दिले. नुकतेच तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि तेलुगू देशम पक्षाशी (टीडीपी) काँग्रेसने आघाडी केली. मात्र, आघाडी केल्यावरही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

 

आंध्र प्रदेशामध्ये चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष सत्तेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाआघाडी करण्यासाठी नायडू धडपडत आहेत. मात्र, आंध्र प्रदेशामध्ये ते काँग्रेसशी आघाडी करतील का, यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. काँग्रेस या राज्यामध्ये स्वंतत्रपणे निवडणूक लढवणार आहे. या बद्दल तुम्ही नायडू यांना सांगितले का?, असा प्रश्न चण्डी यांना विचारला असता, त्यांनी यावरही आपले मत मांडले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@