बीसीसीआयने पांड्या आणि राहुलवरची बंदी उठवली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांच्यावरील बंदी बीसीसीआयने उठवली आहे. या निर्णयामुळे दोघांचा संघात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारीला होणार आहे. निलंबन जरी मागे घेण्यात आले असले तरी दोघांची चौकशी प्रकिया चालू राहणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांनतर बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई करत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबनाची कारवाई केली होती. मात्र आता बीसीसीआयनेच या दोघांवरील बंदी उठवल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघासाठी उपलब्ध असणार आहेत. बीसीसीआयने केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे हार्दिक-राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून चौकशीसाठी माघारी यावे लागले होते. मात्र आता ते न्यूझीलंडविरूध्द भारतीय संघात खेळताना दिसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@